OMG! महिलेने घटवले तब्बल 214 किलो वजन, 8 वर्षे रूममधून बाहेरही निघता येत नव्हते

चार वर्षांपूर्वी अमिता राजानी (42 वर्षीय) यांचं वजन होतं तब्बल 300 किलो. आशियातील सर्वात स्थूल महिला म्हणून त्यांची ओळख झाली होती. मागची 8 वर्षे त्यांना आपल्या रूममधून बाहेरही जाता आले नाही.

मुंबई । चार वर्षांपूर्वी अमिता राजानी (42 वर्षीय) यांचं वजन होतं तब्बल 300 किलो. आशियातील सर्वात स्थूल महिला म्हणून त्यांची ओळख झाली होती. मागची 8 वर्षे त्यांना आपल्या रूममधून बाहेरही जाता आले नाही. परंतु 4 वर्षांच्या कालावधीत त्यांचं वजन 214 किलोंनी कमी झालंय. आज त्यांचं वजन 86 किलो झालं आहे. वजन कमी झाल्यानंतर आपला पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. आता आपलं जीवन पूर्ववत आणि इतरांसारखे आनंदी जगता येईल असं त्या म्हणाल्या.

अमिता यांच्यावर उपचार करणार डॉक्टर शशांक शहा म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात जास्त वजनी पेशंट होता. 5 वर्षांपूर्वी या केसला सुरुवात झाली. माझ्या एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, "डॉक्टर एक मुलगी तीनशेहून जास्त किलो वजनाची आहे, 8-10 वर्षे झाले तिला रूमच्या बाहेरही निघता आले नाही. तिला मदत करा. कारण सर्व डॉक्टरांनी हात टेकले आहेत. तिला एकच किडनी आहे, तीही फेल्युअर आहे, शिवाय टाईप 2 चा डायबेटिस आहे तुम्ही केस घ्याल का?" यानंतर मी तिच्याशी बोललो. एकदा बोलावलं. त्यावेळी तिला स्पेशल कारमधून आणावं लागलं.

[caption id="attachment_15229" align="alignnone" width="1200"] अमिता यांच्यावर उपचार करणारे डॉ. शशांक शहा.[/caption]

यानंतर दीड महिना आम्ही तिच्यावर उपचारांची तयारी करण्यासाठी घालवला. मग 50 किलो वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मग एक दिवस तिच्यावर लॅप्रोस्कोपिक आणि बेरियाट्रिकची ट्रीटमेंट केली. अर्ध्या तासात तिच्यावर ऑपरेशन झालं. दोन ते अडीच तासांनीच ती चालायला लागली. यानंतर तिची खरी वाटचाल सुरू झाली जी कधीच थांबली नाही. आजपर्यंत 300 किलोहून अमिताने 214 किलो वजन कमी करत फक्त 86 किलोपर्यंत आली आहे. ही कदाचित एशियातील सर्वात जास्त वजनाची पेशंट असेल, असेही डॉक्टर शहा म्हणाले.

अमिता आज एकटीने सर्वत्र फिरू शकतात. कधीकाळी त्यांना प्रश्न पडायचा की, हे जग आपल्याला बघायला मिळेल का? परंतु आज त्या सर्व कामे एकटीनेच करतात. लोकलेने फिरतात, ट्रेडिंगचा अभ्यास करतात, स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. अमिता यांचे डायबिटीज, किडनीचा आजारही बरा झाला आहे. अमिता यांच्या पहिल्या शस्त्रक्रियेला 4 ते 5 लाख खर्च आला, दुसऱ्या शस्त्रक्रियेलाही तितकाच आला. गोळ्या औषधांवरही 10 ते 12 लाख रुपये खर्च आला असेल. परंतु एका महिलेला तिचं आयुष्य पुन्हा जगता येतंय, तिचं आयुष्यही आता वाढलंय, असं डॉ. शशांक शहा आवर्जून सांगतात.

अमिता राजानी म्हणतात...

हा मला दुसरा जन्म मिळालाय. मला विश्वासच बसत नाहीये की, हे खरोखर घडलंय. स्वप्नवतच वाटतंय सगळं. सर्वकाही डॉक्टरांच्या उपचारांमुळे शक्य झालंय. मी नव्या उमेदीने आयुष्य जगत आहे.AM News Developed by Kalavati Technologies