गर्भावस्थेत नियमित करा तुळशीच्या पानांचे सेवन, बाळ आणि आई राहतात निरोगी 

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते.

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते. हे त्यांच्यासाठी एक वरदान ठरते. विशेष म्हणजे तुळशीची पानं खाल्ल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. याचे नियमित सेवन केल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका खुप कमी होतो. या पानांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. यामुळे बाळ आणि आई दोघंही निरोगी राहतात.

गरोदर स्त्रियांना होतात हे फायदे -

- तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुण असतात.
- या पानांमध्ये मँग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी हे फायदेशीर ठरते. यामधील मॅगनीज टेंशन कमी करण्याचे काम करते.
- तुळशीच्या पानात अँटी-बॅक्टेरियल गुण असल्यामुळे आई आणि गर्भातील बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.
- तुळशीच्या पानांमध्ये 'व्हिटॅमिन ए' असते. व्हिटॅमिन ए हे गर्भातील बाळाच्या वाढीसाठी महत्त्वपुर्ण मानले जाते.
- गर्भावस्थेत अनेक महिलांना रक्ताच्या कमतरतेची समस्या होते. नियमित तुळशीची दोन पानं खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमरता दूर होते. अशावेळी रोज तुळशीची दोन पानं खाणे फायदेशीर ठरु शकते.

 AM News Developed by Kalavati Technologies