वसुंधरेसाठी 'अर्थ अवर'

संपूर्ण जगभरात आज रात्री साडेआठ ते साडेनऊदरम्यान अर्थ अवर पाळला जाणारेय.. हवामान बदलाविषयी जनजागृती करण्यासोबतच याचे परिणाम कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलून योगदान देणं हा यामागील मूळ उद्देश.

संपूर्ण जगभरात आज रात्री साडेआठ ते साडेनऊदरम्यान अर्थ अवर पाळला जाणारेय.. हवामान बदलाविषयी जनजागृती करण्यासोबतच याचे परिणाम कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलून योगदान देणं हा यामागील मूळ उद्देश. अर्थ अवरदरम्यान एक तासासाठी वीजेची उपकरणे बंद ठेवली जातात. यामुळं ऊर्जेची बचत तर होतेच शिवाय ऊत्सर्जन कमी होण्यातही मदत मिळते. एक तास पृथ्वीसाठी या भावनेतून ही मोहिम जगभरात राबवली जाते. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीपासून सुरू झालेली ही मोहिम सध्या जगभरातील हजारो शहरांपर्यंत पोहोचलीय. या मोहिमेच्या इतिहासाचा आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट..

हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या उद्देशानं सर्वप्रथम 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत अर्थ अवर पाळण्यात आला होता. तेव्हापासून वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर अर्थात डब्ल्यूडब्ल्यूएफच्या पुढाकारानं दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस हा अर्थ अवर पाळला जातो. मार्च महिन्याच्या शेवटचा एक दिवस यासाठी निश्चित केला जातो आणि त्या दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊदरम्यान एक तासासाठी वीजेची उपकरणे बंद ठेऊन अर्थ अवरमध्ये योगदान दिलं जातं.

2007 मधील 31 मार्च रोजी फक्त सिडनीत अर्थ अवर पाळण्यात आला होता. यानंतर यापासून प्रेरणा घेत ऑक्टोबर 2007 मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतही अशाच प्रकारे अर्थ अवर पाळण्यात आला. या दोन्ही मोहिमांना यश मिळाल्यानंतर 2008 मधील अर्थ अवरसाठी चांगलं नियोजन करण्यात आल. आणि 29 मार्च 2008 रोजी दुसरा अर्थ अवर पाळण्यात आला. यात 35 देशांतील सुमारे 400 शहरांनी सहभाग नोंदवला. नंतर ही मोहिम जगभरात चांगलीच लोकप्रिय ठरली आणि 28 मार्च 2009 मधील अर्थ अवरमध्ये 88 देशांतील तब्बल 4159 शहरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावर्षी प्रथमच संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयानंही अर्थ अवरमध्ये सहभाग नोंदवला. यानंतर 27 मार्च 2010 रोजी चौथ्या अर्थ अवरमध्ये 126 देशांनी सहभाग नोंदवला. तर 2011 मधील अर्थ अवरमध्ये 135 देशांतील 5251 शहरं, 2012 मधील अर्थ अवरमध्ये 152 शहरांतील सुमारे 7 हजार शहरं, 2013 मधील अर्थ अवरमध्ये सात हजारांपेक्षा जास्त शहरांनी, 2014 मधील अर्थ अवरमध्ये 162 देशांनी, 2015 मधील अर्थ अवरमध्ये 170 देशांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर आता जवळपास संपूर्ण जगभरातच अर्थ अवर पाळला जात आहे. आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी काही जणांनी सुरू केलेली ही मोहिम आता एक जागतिक चळवळ बनली आहे. या चळवळीप्रमाणे इतरही माध्यमांतून निसर्ग संवर्धनाचे काम आपण सर्वांनी नेहमीच करूया हाच यानिमित्तानं एएम न्यूजचा संदेश...AM News Developed by Kalavati Technologies