तुर्कीहून कांदा आयातीचा केंद्र सरकारचा निर्णय, 12 डिसेंबरपर्यत भारतात पोहचणार

अफगाणिस्तान, इजिप्तच्या कांद्यापेक्षा तुर्कस्थानातील कांद्याचा दर्जा चांगला

नवी दिल्ली । देशातल्या अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किरकोळ विक्रीच्या दराने शंभरी ओलांडली असल्याने हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तुर्कीहून 11 हजार मेट्रीक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमटीसीने तुर्की येथून 11,000 टन कांद्याच्या आयातीचा करार केला असून पुढील वर्षी जानेवारीत कांद्याची आयात होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सरकारने इजिप्तकडून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार एमएमटीसीने 6090 कांद्याची ऑर्डर दिली होती. परंतु कांद्याची पहिली फेरी 12 डिसेंबरपर्यत भारतात पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies