पेटीएम वापरकर्त्यांना धक्का, पैसे पाठवण्यासाठी 2% फी

डेबिट कार्ड, यूपीआय हस्तांतरण विनामूल्य

नवी दिल्ली । नवीन वर्षात पेटीएम वापरकर्त्यांना क्रेडिट कार्डवरून आपल्या ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करणे महाग होणार आहे. कारण पेटीएम वापरकर्त्याने त्यांच्या ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डमधून महिनाभरात 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास त्यांना 2% शुल्क आकारले जातील. कंपनीने आपल्या नव्या धोरणानुसार ही माहिती दिली आहे.

तथापि, वॉलेट टॉप-अप हे डेबिट कार्ड आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) साठी नि:शुल्क असेल. विशेषज्ञांनुसार, अशा व्यवहारांवरील खर्च वाचवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

पेटीएमने ट्वीट करून म्हटले आहे की, "जर तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जमा केलेली एकूण रक्कम ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर व्यवहाराच्या एकूण रकमेवर 1.75% + जीएसटी द्यावे लागेल."

दरम्यान, असं पाऊल उचलण्याची पेटीएमची ही पहिलीच वेळ नाही. एक वर्षापूर्वीही कंपनीने असे शुल्क आकारण्याचा विचार केला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. या बदलांवर वापरकर्ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण बरेच वापरकर्ते इतर टॅक्सीचे भाडे अथवा इतर पेमेंटसाठी त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनच पैसे जमा करत असतात.AM News Developed by Kalavati Technologies