Breaking..! मुंबईत आता सर्वच दुकाने उघडी राहणार; 5 ऑगस्टपासून सुरू होणार दुकाने

मुंबईची लाईफ-लाईन लोकल मात्र; अजुनही बंदच राहणार, त्यामुळे लोकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागणार आहे

मुंबई । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुंबानगरीचा वेग मंदावला होता. गेल्या 5 महिन्यापासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पुनश्च हरीओम अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनलॉकची घोषणा केली होती. आणि त्यानंतरच अनलॉकची 1 आणि 2 टप्पे सुरु करण्यात आले. त्याचबरोबर राज्यात अनलॉक 3 ची सुद्दा घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी आता मिळाली आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे पहिल्यांदाच एवढे दिवस मुंबईत दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

लॉकडाऊन हटविल्यानंतरही सरकारने निवडक दुकानांनाच परवानगी दिली होती. आता मात्र सरसकट सगळ्याच दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटरवर विक्री करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचा कहर हा देशभरात सुरूच असुन, गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत आहे. अनलॉक 3 मध्ये 5 ऑगस्टपासून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करणात येणार आहे.lifAM News Developed by Kalavati Technologies