हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ठ गायकांमधील एक नाव शंकर महादेवन. 'कजरा रे कजरा रे' हे आयटम सॉंग असो की कट्यार काळजात घूसलीमधील शास्त्रीय गायन. त्यांच्या अमृतमय स्वरांनी त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. सर्वच गायन प्रकारात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या अवलिया गायकाचा आज जन्मदिन. चला तर मग जाणून घेवूयात शंकर महादेवन यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी.
1.शंकर महादेवन यांचा जन्म मुंबईतील चेंबूरमध्ये तमिळ अय्यर कुटुंबात झाला.
2. बालपणापासूनचं त्यांना गाण्याची आवड होती, त्यामुळे शालेय शिक्षणासोबतचं त्यांचे गायन प्रशिक्षण सुरू होते.
3. महादेवन यांनी 1988 मध्ये कॉम्प्यूटर सायन्समधून डिग्री पुर्ण केली आणि नंतर बराच वेळ सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून त्यांनी काम केलं.
4.1998 मध्ये शंकर महादेव यांनी गायलेल्य ब्रीद लेस गाण्यामुळे ते सर्वप्रथम प्रकाशाझोतात आले. संपुर्ण गाणं त्यांनी श्वास रोखून गायलं होतं.
5.महादेवन यांना 'बोलो ना' या गाण्यासाठी 2012 चा सर्वोत्कृष्ठ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
6.गिटारवादक एहसान आणि पियानोवादक लॉय यांच्यासोबत महादेवन यांनी अनेक चित्रपटांसाठी संगितकाराचे काम केले, 'दिल चाहता है,' 'कल हो ना हो,' 'जिंदगी मिलेगी ना दोबारा' या चित्रपटातील गीतांचे बोल आजही तरूणाईच्या ओठांवर रेंगाळताताना दिसतात ते केवळ शंकर महादेवन यांच्यामुळेच.
7. 2015 च्या कट्ट्यार काळजात घूसली या मराठी चित्रपटात व 1996 च्या 'एक से बढकर एक' या दूरदर्शनवरील मालिकेत महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ठसा ही उमटवला.