स्पेशल डेस्क । जर तुम्ही Tata ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण, एक एप्रिल 2020 पासून भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी भारत स्टेज-4 म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार आहे. त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आपल्याकडील शिल्लक BS4स्टॉक संपवण्यासाठी विविध ऑफर देत आहे. याअंतर्गत देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी Tata Motors आपल्या BS-4 प्रकारच्या काही गाड्यांवर तब्बल दोन लाखापर्यंत डिस्काउंट देत आहे. यामध्ये Tiago पासून Hexa, Harrier यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.
Tata Zest
टाटा झेस्ट कंपनीच्या डिलरशिपने झेस्ट सह 90 हजार रुपयांपर्यंतचा फायदा दिला आहे. कारमध्ये 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जी 90PS पॉवर आणि 140 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यासह, फियाटचे 1.3-लिटर डिझेल इंजिन 75 PS / 190 Nm आणि 90 PS / 200 Nm या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Tata Bolt
टाटा बोल्ट देशभरातील डिलर्सला 80,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. कारची किंमत 5.29 ते 7.87 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. झेस्ट प्रमाणेच, बीएस 6 इंधन उत्सर्जन नियम लागू झाल्यानंतर बोल्ट देखील बंद केले जातील.
Tata टैगोर
बीएस 4 टिगोरच्या डिझेल व्हेरिएंटवर 70,000 रुपये सूट दिली जात आहेत. तर पेट्रोल ट्रिमवर 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Tata Nexon
टाटा नेक्सनच्या प्री-फेसलिफ्ट बीएस 4 मॉडेलवर 55,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहेत.
Tata Safari Storme
एसयूव्हीच्या खरेदीवर तुम्ही 55,000 रुपयांपर्यंत फायदा घेऊ शकता. डिलरशिपमध्ये उपलब्धतेच्या आधारे हा लाभ मिळेल.
सफारी स्टॉर्मला हेक्सासारखेच 2.2-लिटर व्हॅरीकोर 400 डिझेल इंजिन मिळते. हे दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. प्रकारात 150 पीएसची शक्ती आणि 320 एनएम टॉर्क मिळतो. तर उच्च व्हेरिएंट इंजिन 156 पीएस पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते.
Tata Tiago
टियागो बीएस 4 च्या डिझेल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. तर पेट्रोल ट्रिमवर 45,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Tata Harrier
टाटा बीएस 4 स्टॉक रिकामे करण्यासाठी या एसयूव्हीसह 1.3 लाख रुपयांपर्यंत ऑफर देत आहे.
Tata Hexa
कंपनी सध्या बीएस 4 हेक्सावर 1.5 लाख रुपयांपर्यंतचे रोख लाभ तसेच 50,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट देत आहे.