या देशात बाळाला जन्म दिल्यावर मिळते लाखोंचे बक्षिस

ही योजना सुरू झाल्यानंतर येथे 60 बाळांचा जन्म झाला आहे.

नवी दिल्ली | 2013 पासून फिनलँडच्या सर्वात लहान नगरपालिकांमधील लेस्टिजारवीमध्ये जन्माला येणारे प्रत्येक बाळ 10 हजार यूरो म्हणजे जवळपास सात लाख 86 हजारांचे आहे. लेस्टिजारवीच्या प्रशासकांनी या गावातील कमी होत असलेल्या लोकसंख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. एका वर्षापूर्वी या गावात फक्त एकाच बाळाचा जन्म झाला होता.

नगरपालिकेने 'बेबी बोनस' नावाने एक योजना सुरू केली. बाळाच्या जन्मावर पुढच्या 10 वर्षात 10 हजार यूरो देण्यात येतील. हा उपाय फायदेशीर ठरला. योजना सुरू झाल्यानंतर नगरपालिकेत आतापर्यंत 60 बाळांचा जन्म झाला आहे. यापूर्वीच्या सात वर्षात फक्त 38 बाळांचा जन्म झाला होता. जवळपास 800 लोकांच्या या गावात नवीन मुलांच्या जन्माने चैत्यन्य निर्माण झाले आहे.

बेबी बोनस मिळवणारे 50 वर्षांचे जुक्का-पेक्का टुइक्का आणि 48 वर्षांच्या त्यांच्या पत्नी जेनिका शेतकरी आहेत. त्यांच्या दुसऱ्या मुलीचा जन्म 2013 मध्ये जन्म झाला. जन्मल्यानंतर तिला 'टेन थाउजेंड यूरो गर्ल' हे उपनाव मिळाले होते. टुइक्का म्हणतात की, 'आमचे वय वाढत होते आणि काही बऱ्याच दिवसांपासून आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्लानिंग करत होतो. यामुळे मी पैशांना प्रभावित होऊन असे केले असे म्हणता येणार नाही'

तरीही टुइक्का यांना वाटते की, पैसे देण्याचा निर्णय महत्त्वाचे पाऊल आहे. यावरुन समजते की, येथील स्थानिक नेत्यांना कुटुंबांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. टुइक्का यांच्या कुटुंबांना आतापर्यंत 6,000 यूरो मिळाले आहे. हे त्यांनी सेव्ह करुन ठेवले आहे. भविष्यात फायद्यासाठी या पैशांचा वापर करु असेही त्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies