स्वाइन फ्लूचा सर्वोच्च न्यायालयाला तडाखा, सहा न्यायाधीशांना विषाणूची लागण

दिल्लीत 'स्वाइन फ्लू' विषाणू पून्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. सामान्या नागरिकां सोबतचं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ही या विषाणूची लागण झाली आहे.

दिल्ली : जगभरातील कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या गंभीर घटना समोर येतं आहेत.  भारत या विषाणूशी लढायला सज्ज असल्याचं चित्र दिसत असलं तरी, दिल्लीत 'स्वाइन फ्लू' विषाणू पून्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. सामान्य नागरिकां सोबतचं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ही या विषाणूची लागण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनूसार, सर्वोच्च न्यायलयाच्या सहा न्यायाधीशांना 'स्वाइन फ्लू' या गंभीर संसर्गजन्य विषाणूची  लागण झाली असून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात यावी ही विनंती त्यांनी सरन्यायाधीश एस ए बोबडे यांना केलीये.  ते पुढे म्हणाले की, "या आरोग्य आणीबाणीशी निपटण्यासाठी सरन्यायाधीशांनी योग्य त्या सूचना संबंधीत विभागांना देवू कराव्यात." सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायाधीश एकाच वेळी उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायलयाच्या कामकाजावर याचा परिणाम होतं आहे. 

या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दूषंत दवेंशी चर्चा करून परिस्थीतीचा आढावा घेतला. तसेच न्यायाधीशांच्या उपचारासाठी लागेल शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. तेलंगणामध्ये  स्वाइन फ्लू ग्रस्त 150 नवे रूग्ण अढळले आहेत, बेंगलोर स्थित बऱ्याच परदेशी सॉफ्टवेअर कंपन्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. AM News Developed by Kalavati Technologies