राज्याला दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480 कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

मुंबई । देशभरामध्ये 73 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. मुंबईमध्ये मंत्रालय येथे मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसंच राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी पोहचवण्यासाठी नेमके काय पाऊल उचलत आहेत हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे अस सांगत. पुनर्वसनासाठी 6 हजार 800 कोटींचे पॅकज तयार केले असून विक्रमी वेळेत पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्री यांनी ग्वाही दिली आहे.

राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, असे असताना गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480 कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतीमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480 किलो मीटरचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतीमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies