पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा- तिन्ही सैन्यांचा सेनापती असेल चीफ ऑफ डिफेंस स्टाफ

सैन्याच्या इतिहासात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली । भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांना हात घातला. मोदींनी यावेळी तिन्ही सैन्यांच्या सेनापतिपदाची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. सीडीएस म्हणून हे पद ओळखले जाईल. तिन्ही सैन्यदलांनी एकसूत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. पीएम मोदी म्हणाले की, आपल्या देशात सैन्य व्यवस्था, सैन्यशक्ती आणि सैन्य संसाधनांमध्ये सुधारावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. अनेक आयोगांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आपल्या तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय आहे, परंतु आज जग बदलत आहे यामुळे भारताने वेगळा विचार करण्याची गरज आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या पूर्ण सैन्यशक्तीला एकसंघ होऊन एकसाथ पुढे येऊ काम करावे लागेल. आता आम्ही चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजेच सीडीएसची व्यवस्था करू. हे पद अस्तित्वात आल्यानंतर तिन्ही सैन्यांच्या शीर्षस्तरावर एक प्रभावी नेतृत्व मिळेल.



AM News Developed by Kalavati Technologies