वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आपण 370 हटवू शकलो - भागवत

अनेकदा लोक म्हणतात 'मोदी ही तो मुमकिन है' ते काही चूक नसल्याचेही ते म्हणाले

नागपूर | देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांचे स्मरण करून आज परत संकल्प केला पाहिजे. असाच वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच 370 हटवू शकलो आहोत. 370 हाटविण्यामध्ये राजकिय इच्छाशक्तीचा मोठा वाटा आहे. असे निर्णय घेताना निर्णयक्षम नेतृत्व लागते. अनेकदा लोक म्हणतात 'मोदी ही तो मुमकिन है' ते काही चूक नसल्याचेही ते म्हणाले. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान हा भारताला ललकारात असून भारत सरकार याचं यथोचित उत्तर देईल असे आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.

नागपूर येथील संघ मुख्यालयात आज मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. त्या प्रसंगी ते बोलत होते. 'देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचं आज स्मरण करायला हवं. 'कलम ३७०' हटविण्याचा संकल्प संपूर्ण समाजाचा होता. असे संकल्प करण्याचा आज दिवस आहे,' असं ते म्हणाले. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी भय्याजी जोशी हे देखील यावेळी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies