सुधागड तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आला

रायगड । तब्बल 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे. देशभरात प्रचंड उत्साह असून अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची उत्साहात साजरी करण्यात आले आहे. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, सर्वच ठिकाणी साजरा करण्या आले. तहसिलदार कार्यलयात यंदा वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिनाचे साजरा करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्यासह सभापती, गटविकास आधिकारी, जि.प.सदस्य, सुधागड तालुका समन्वय समिती अध्यक्ष, पोलीस निरीक्षक, या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तहसिलदार कार्यलयाचा हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. तसेच कोल्हापूर, सांगली, पाली येथे मुस्लिम समाजाने पूरग्रस्त मदतीसाठी मदत म्हणून रक्कम सुधागड-पाली तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी राजकिय, सामाजिक क्षेत्रातले मान्यवर पालीसह सुधागड तालुक्यातील नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies