बीडच्या ‘एव्हरेस्टवीर’ शिवाजीने कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकवत गायले राष्ट्रगीत

बीडच्या ‘एव्हरेस्टवीर’ शिवाजीने कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकवत गायले राष्ट्रगीत

बीड । जगातील सर्वात उच्च असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट या शिखरावर, तिरंगा फडकविण्याचा पराक्रम केलेल्या, बीडच्या शिवाजी भागवत महागोविंद या ध्येय वेड्या तरुणाने, सायकलवर साडेतीनशे किलोमीटर प्रवास करत, आज स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील सर्वात उच्च असणाऱ्या कळसुबाई शिखरावर तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा फडकवत राष्ट्रगीत म्हटलं आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या, शिवाजीने जगातील सर्वात उच्च असणाऱ्या, माउंट एव्हरेस्टवर 8 मे रोजी तिरंगा फडकविला होता. त्यानंतर त्याने स्वातंत्र दिनाला कळसुबाई शिखरावर तिरंगा फडकवायचा असा निर्धार करत , 12 ऑगस्टपासून सलग तीन दिवस, साडेतीनशे किलोमीटर सायकलने प्रवास करून शिखर गाठले. अवघ्या दिड तासात शिखर सर करत, त्याने तेथिल मंदिरावर तिरंगा व भगवा झेंडा, सकाळी 7.15 मिनिटांनी फडकविलाय . दरम्यान बीडच्या या शिवाजीच्या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies