महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकानं सन्मान, आर.आर.आबांच्या भावाचा दुसऱ्यांदा सन्मान

राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबई  । 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली. तर पाच जणांना विशेष सेवेसाठी आणि 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या ते कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. होमगार्ड, नागरी सेवा आणि अग्निशमन विभागात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.AM News Developed by Kalavati Technologies