Independence Day Special: जाणून घ्या, जन-गण-मन भारताचे राष्ट्रगीत कसे बनले?

जाणून घ्या, राष्ट्रगीताशी संबंधित रंजक माहिती...

शाळेत असल्यापासून प्रत्येक भारतीय जे गीत न चुकता म्हणतो ते म्हणजे जन-गण-मन... पण हे गीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले यापेक्षा जास्त माहिती बहुतांश जणांना नाही. चला तर मग जाणून घेऊया, या राष्ट्रगीताशी संबंधित रंजक माहिती...

एखाद्या देशाचे राष्ट्रगीत म्हणजे जे देशाचा इतिहास आणि परंपरेला दर्शवते. याशिवाय एखाद्या देशाची ओळखही करून देते. भारताचे राष्ट्रगीत मुळात बंगालीमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते.

27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्यातील (कोलकाता) सभेत गायिले गेले होते. त्या काळी बंगालच्या बाहेरच्या लोकांना याची माहिती नव्हती. संविधान सभेने जन-गण-मनला भारताच्या राष्ट्रगीताच्या रूपात 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. तथापि, 1905 मध्ये हे गीत बंगालीत लिहिण्यात आले होते.

जन-गण-मनला त्यातील अर्थामुळे राष्ट्रगान बनवण्यात आले. याच्या काही अंशांचा अर्थ आहे की, भारताचे नागरिक, भारताची जनता आपल्या मनाने तुम्हाला भारताचे भाग्यविधाता समजते. हे अधिनायक तुम्ही भारताचे भाग्यविधाता आहात. यासोबतच यात देशाच्या विविध राज्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यातील वैशिष्ट्यांबाबतही सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, वंदे मातरमलाही राष्ट्रगान बनवण्याची चर्चा सुरू होती, परंतु त्याला राष्ट्रीय गीत बनवण्यात आले. कारण यातील सुरुवातीच्या चार ओळी देशाला समर्पित आहेत, इतर ओळी बंगाली भाषेत असून दुर्गामातेच्या स्तुतिपर आहेत. यामुळे संपूर्णपणे देशाचे वर्णन करणारे गीत म्हणून वंदे मातरम ऐवजी जन-गण-मनला राष्ट्रगीत बनवण्यात आले.

राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंदांचा वेळ लागतो. तर याचे संस्‍करण चालवण्याचा काळ जवळजवळ 20 सेकंद आहे. राष्ट्रगीतात 5 पदे आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीताचे केवळ लेखनच केले नाही, तर ते गायिलेही. हे गीत आंध्र प्रदेशच्या मदनपिल्लै जिल्ह्यात गाण्यात आले होते.

राष्ट्रगीताशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गीत सुरू असताना सावधान अवस्थेत उभे राहिले पाहिजे. आजकाल केवळ शाळा महाविद्यालयांतच नव्हे तर प्रत्येक सिनेमागृहात चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवले जाते. देशाच्या स्वातंत्र्याचा, राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी या गीतावेळी प्रत्येक भारतीय उभे राहून आदर व्यक्त करतो.AM News Developed by Kalavati Technologies