औरंगाबाद | कलिंगड हे लाल असते हे तुम्हां आम्हांला माहीत आहे. अनेकजण कलिंगड आवडीने खातात, पण तुम्ही कधी पिवळ्या रंगाचे कलिंगड बघितले आहे का? पैठणच्या बाजारात चक्क पिवळ्या रंगाचे कलिंगड विक्रीला आले आहेत. प्रथमच पिवळ्या रंगाचा गर असलेले कलिंगड बाजारात विक्रीला आल्याचे बघुन पैठणकर अंचबित झाले आहे. सध्या पिवळ्या रंगाचे कलिगंडचे पिक अहमदनगर जिल्ह्यातील घेतले जात आहे. याची कलम बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदाच हे पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी आल्याचे पाहुन ग्राहक सुध्दा आवाक झाले. चवीला गोड कलिंगड असल्याने ग्राहकांनी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहे.
पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी, ग्राहक अचंबित
प्रथमच पिवळ्या रंगाचा गर असलेले कलिंगड बाजारात विक्रीला आल्याचे बघुन पैठणकर अंचबित झाले आहे.
