आहारात असा करावा बीटरुटचा समावेश, तयार करा पौष्टीक चटणी

आरोग्यासाठी बीट खुप फायदेशीर असते. जास्तीत जास्त लोक बीट सलादाच्या स्वरुपात खातात. पण आपण वेगळ्या पध्दतींनीही बीटाचे सेवन करु शकतो.

आरोग्यासाठी बीट खुप फायदेशीर असते. जास्तीत जास्त लोक बीट सलादाच्या स्वरुपात खातात. पण आपण वेगळ्या पध्दतींनीही बीटाचे सेवन करु शकतो. बीटामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन आणि कॅल्शियम असते. आज आम्ही तुम्हाला बीटाची पौष्टीक चटणी कशी तयार करावी हे सांगणार आहोत.

बीटाची चटणी तयार करण्यासाठी भाजलेले बीट, कुस्करलेले खोबरे आणि काही मसाले हवे असतात.
साहित्य :-
1. एक मोठी बीट ( सोलून आणि कापून घ्यावे)
2. 1/4 टीस्पून मोहरी
3. 1/2 टीस्पून जिरे
4. 1 टीस्पून उडीद डाळ
5. 1 टीस्पून हरब-याची डाळ
6. लसणाच्या पाकळ्या (बारीक कट केलेल्या)
7. 5-7 कढीपत्याची पानं
8. 1 लाल मिरची(दोन तुकडे करुन घ्यावे आणि यामधील बिया काढून टाकाव्या)
9. 2 टेबलस्पून कुस्करलेले खोबरे
10. 1 टीस्पून लिंबूचा रस
11. चवीनुसार मीठ
12. गरजेनुसार तेल

कृती :-
1. पॅन किंवा कढईमध्ये तेल घ्या आणि मंद आचेवर गरम करा. याला जिरा मोहरीची फोडणी द्या. यानंतर यामध्ये उडीद आणि हरब-याची डाळ टाका. हे दोन मिनिटे भाजून घ्या. यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि मिरची टाका. डाळ थोडी भाजून घ्या. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
2. आता त्याच पॅनमध्ये अजून थोडे तेल टाका. यामध्ये कट केलेले बीट आणि मीठ मिसळा.
3. यामध्ये कुस्करलेले खोबरे भाजून घ्यावे.
4. टॉपिंगसाठी सुरुवातीच्या डाळींच्या मिश्रणातील थोडेसे मिश्रण बाजूला काढून ठेवा. उर्वरित मिश्रण मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
5. यामध्ये भाजलेले बीट आणि लिंबूचा रस मिसळा.
6. भाजलेले बीट आणि लिंबूचा रस मिक्सरमधून काढून घ्या आणि पेस्ट बनवा. तुम्हाला थोडी ग्रेव्ही असलेली चटणी हवी असेल तर त्यामध्ये गरजेनुसार पाणी मिसळा. हे एका भांड्यात काढून घ्या आणि त्या काढून ठेवलेल्या डाळ-मसाल्यांच्या मिश्रणाने ही चटणी सजवा. तुमची चविष्ट आणि पौष्टिक बीटाची चटणी तयार आहे.AM News Developed by Kalavati Technologies