राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपत असून, त्यावर मोदी यांनी आपली आठवणींना उजाळा दिला

नवी दिल्ली । संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा हा 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आज राष्ट्रपतीच्या अभिभाषण, धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत छोटसं भाषण केलं. त्या भाषणात पंतप्रधान भावुक झाले होते. कारण राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पुर्ण होत आहे. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, 'गुलामजी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा मी सुद्धा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो.

आमचे मित्र संबंध खूप चांगले आहे. एकदा गुजरातच्या प्रवाशांवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी सगळ्यात अगोदर मला गुलाम नबी यांचा फोन आला होता. त्यावेळी ते रडत होते. त्यावेळी संरक्षण मंत्री हे प्रणव मुखर्जी होते. त्यावेळी मृत्यदेह आणण्यासाठी मी गुलाम नबी यांना सेनेच्या विमानाची मागणी केली होती. त्यावर त्यांनी मी व्यवस्था करतो. असे म्हटलं होते. गुलाम नबी त्या रात्री एअरपोर्टवर आले. त्यांनी मला फोन केला आणि आपल्या कुंटुबातील व्यक्तीची आपण चिंता करतो. अगदी तशीच चिंता ते करत होते. सत्ता जीवनात येत असते, मात्र त्याला कसं पचवायचं. हे गुलाम नबी कडून शिकावे. या क्षणी मी खूप भावूक झालो होतो.'गुलाम नबी यांच्या कामाचं आणि अनुभवाचं मी आदर करतो. मला विश्वास आहे की, सौम्यता, नम्रता आणि देशाच्या विकासासाठी यांची धडपड त्यांच्यात आहे. असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद यांना आपला चांगला मित्र असल्याचं सांगितलं. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जो व्यक्ती हे पद सांभाळणार आहे त्यांना गुलाम नबी यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, याची मला चिंता आहे. कारण गुलाम नबी आझादजी आपल्या पक्षाची काळजी घेत होते. सोबतच देश आणि सदनाचीही ते तेवढीच काळजी घेत होते. ही लहान गोष्ट नाही. अन्यथा विरोधी नेत्याच्या रुपात प्रत्येकाला आपला दबदबा कायम ठेवण्याची इच्छा असते. हा मोह कुणालाही होऊ शकतो. परंतु, ते सदनाला आणि देशाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांपैंकी एक आहेत. मी शरद पवार यांनाही या श्रेणीमध्ये ठेवू इच्छितो.' असे म्हणत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही कौतुक केलं.AM News Developed by Kalavati Technologies