या निवडणुकीत पहिल्यांदाच केला जातोय VVPAT मशीनचा वापर, काय असतं VVPAT?

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येतोय. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, हे त्याला कळणार आहे.

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येतोय. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, हे त्याला कळणार आहे. या मशीनद्वारे प्रिंट होऊन एक पावती दिसेल. पण मतदाराला ती पावती घेता येणार नाही.

काय असतं VVPAT?

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात. यामुळे ही यंत्रणा पुढे आली आहे. कारण ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची अफरातफर होते असा आरोप वारंवार केला जातो. या परिस्थितीत आपले मतं सुरक्षितपणे आपल्याच उमेदवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो.

1. व्हीव्हीपॅट मशीनचा अर्थ होतो ‘Voter Verifiable Paper Audit Trail’.

2. मतदार हा कोणत्याही एका उमेदवाराला मत देत असतो. आपण आपल्या उमेदवाराला दिलेले मत त्यालाच मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी व्हीव्हीपॅट या मशीनचा वापर केला जातो.

3. मतदाराने आपल्या उमेदवाराला दिलेले मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली यंत्रणा म्हणचे व्हीव्हीपॅट आहे.

4. मतदाराने मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट त्याच क्षणी त्याची माहिती मतदाराला देते. आपले मत ठरवलेल्या उमेदवारालाच मिळाले आहे ना यावर व्हीव्हीपॅट शिक्कामोर्तब करते.

व्हीव्हीपॅट मशीन कसे चालते?

- जेव्हा आपण EVM मशीनवर मतदान करतो तेव्हा उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप 7 सेकंद आपल्याला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप असा आवाज वाजतो आणि ही स्लिप सीलबंद पेटीत जमा होते.

- मतदान करताना काही तांत्रिक अडचण आली असेल तर त्याचीही माहिती देण्यात येते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ठरवलेलं मतदान झालं आहे की नाही याची आपल्याला खातरजमा करण्याची संधी मिळते.

- VVPAT मशीन काचेच्या पेटीत असतं, जेणेकरून मतदान केलेला मतदारच स्लिपवरचा तपशील पाहू शकतो.

- VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो.

- VVPAT मधला पेपर रोल प्रत्येक मतदानावेळी 1500 स्लिप प्रिंट करू शकतो.AM News Developed by Kalavati Technologies