3 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क वापरणे होऊ शकते धोकादायक - पीएचई

ब्रिटेनच्या पीएचई संस्थेच्या मते, 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी मास्क लावण्याने दम गुदमरू शकतो किंवा जीव सुद्धा जाऊ शकतो

डेस्क स्पेशल । एकीकडे कोरोनाने साऱ्या जगात धुमाकुळ घातले असतांना, कोरोनापासून बचावासाठी सर्वजण आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मास्कची. कोरोनापासून बचावासाठी अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यत आपण मास्कचा वापर करत असतो. कोरोनापासुन बचावासाठी मास्क हाच आपला मोठा शस्त्र असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र ब्रिटेनच्या एका आरोग्य संस्था (पीएचई) ने असे विधान केले आहे की तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कचा वापरने धोकादायक आहे. पीएचईच्या मते तीन वर्षांखालील मुलांना जर मास्क लावले तर त्यांचा दम गुदमरू शकतो, किंवा त्यांचा जीव सुद्धा धोक्यात जाऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, तीन वर्षांखालील मुलांची श्वसननलिका ही नाजूक असते. त्यामुळे लहान मुलांनी मास्क परिधान केले तर श्वास घेताना आणि श्वासोच्छवासामध्ये त्रास होऊ शकतो.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने असे म्हटले आहे की, जे मुले तोंड आणि नाक या दोन्ही माध्यमातून श्वास घेतात. त्यांच्यासाठी मास्क वापरून धोकादायक होऊ शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत लहान मुलांनी मास्क घालणे टाळावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लहान मुलांना घराबाहेर काढू नका असे आव्हानही नॅशनल हेल्थने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies