झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, नोकरी दिल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव

झोमॅटोने दिव्यांग व्यक्तीला डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी दिली आहे. या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडिया झपाट्याने व्हायरल होत आहे.

एएम न्यूज नेटवर्क | झोमॅटोने दिव्यांग व्यक्तीला डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी दिली आहे. या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडिया झपाट्याने व्हायरल होत आहे. ट्विटर युजर्स दिव्यांगाला नोकरी दिल्याबद्दल झोमॅटोचे कौतुक करत आहेत. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू फुटेल. एक दिव्यांग व्यक्ती झोमॅटोचा टी-शर्ट घालून तीनचाकी सायकल चालवत आहे व सायकलवर झोमॅटोची बॅग आहे. झोमॅटोने अपंग व्यक्तीला डिलिव्हरी बॉय बनवले आहे.

अभिनेत्री रवीना टंडन म्हणते, 'आपल्याला अशाच कंपन्या हव्या आहेत ज्या असे काम करतील आणि दिव्यांगाना नोकरी देतील. चांगले काम करताय झोमॅटो' त्याबरोबरच एका व्यक्तीने म्हटले, 'जहां चाह होती है वहां राह होती है.'AM News Developed by Kalavati Technologies