काँग्रेस नेते आज घेणार सोनिया गांधींची भेट, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत करणार चर्चा

काँग्रेसमधील एक गट हा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे.

मुंबई | सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नाहीये. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर आम्ही विरोधी पक्षात बसणार असे म्हणत शिवसेनेला पाठिंबा देण्यात नकार दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. याच काळात आज काँग्रेस नेते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे 90 टक्के आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने असल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्यात नकार दिला असला तरीही काँग्रेसमधील एक गट हा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. तर विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवर यांच्या मते, 90 टक्के काँग्रेसच्या आमदारांचं असं म्हणण आहे की, भाजप सरकार नको यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यात तयार आहेत. हीच भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते आज दिल्लीत हायकंमांडची भेट घेणार आहे. यासोबतच शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी हायकंमांडकडे आग्रहाची भूमिका मांडण्यात येणार आहे. थोड्याचं दिवसांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींची यांच्या भेटीमध्ये सत्तास्थापनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies