उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या मुलींवर तरुणाने केला अ‍ॅसिड हल्ला

युपीतील गोंडा जिल्ह्यातील पसका गावात तीन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला असून, या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत

गोंडा । उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने जरी महिलांच्या सुरक्षेबाबत मोठ-मोठे विधान होत असले तरी, युपीतली सत्य परिस्थिती वेगळीच आहे. युपीतील गोंडात सोमवारी रात्री तीन सख्या बहिणीवरती अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. त्यामुळे आता योगी सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती सतर्क आहे हे एकदा समोर आले आहे. सदरील तिन्ही तरुणींचा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील पसका या गावात सोमवारी रात्री तिन्ही बहिणी घराच्या छतावरती झोपल्या होत्या. त्यादरम्यान मध्यरात्री एक तरुण वरती आला व त्याने मोठ्या मुलीवर  अ‍ॅसिड फेकले. त्यामुळे आजुबाजुच्या दोन्ही मुलीवर अ‍ॅसिड पडल्याने तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दोन मुली गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेतील मोठी मुलगी 19 वर्षाची असून दोन मुली 7 व 5 वर्षाची आहे. पोलीस सदरील घटनेचा सविस्तर तपास करीत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: