उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश अज्ञात व्यक्तीने 112 या यूपी पोलीस हेल्पलाईन सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठविला आहे. हा संदेश पाठविणार्‍या व्यक्तीने मुख्यमंत्री योगी यांचे वर्णन एका विशिष्ट समुदायासाठी धोकादायक असल्याचं म्हंटल आहे. याप्रकरणी लखनऊच्या गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

यूपी पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशिरा सुमारे सव्वाबाराच्या सुमारास हा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा संदेश डायल 112 च्या सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सअॅप नंबर 7570000100 वर आला आहे. 'मी मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवून देणार आहे'. असे संदेशात लिहिले आहे. दरम्यान हा मॅसेज मिळताच युपी पोलीस सतर्क झाले असून नेमका हा मॅसेज कुणी पाठवला याचा शोध घेणे सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies