उन्नाव । अंत्यसंस्कारासाठी कुटुंब तयार, बहिणीला नोकरी, 25 लाखांची भरपाई आणि...

कुटुंबातील इतर सदस्यांनाही सुरक्षा देण्यात येणार

नवी दिल्ली । पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री येईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी मागणी केली होती. यावर पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटूंबाशी बोलून अंत्यसंस्कार केले. पीडितेचा शनिवारी सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. प्रधानमंत्री आवास निधीतून पीडित कुटुंबासाठी 25 लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.  आयुक्त म्हणाले, पीडित कुटुंबाला 25 लाख रुपये देण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या बहिणीला सरकारी नोकरी दिली जाईल. गृहनिर्माण योजनेंतर्गत, कुटुंबास एक घर दिले जाईल आणि विद्यमान घर निश्चित केले जाईल. मुलीच्या बहिणीला पोलीस संरक्षण देण्यात येईल. सुरक्षा कर्मचारीही घरी तैनात असतील.

लखनऊचे पोलीस आयुक्त मुकेश मेश्राम यांनी सांगितले की, पीडित बहिणीसाठी नोकरीची व्यवस्था केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीडित कुटुंबाला दोन घरे देण्यात येणार आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. पीडित बहिणीला चोवीस तास सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनाही सुरक्षा देण्यात येईल. कुटुंबीयांनी पोलिसांना संरक्षणासाठी विनंती केली होती.

उन्नाव येथील बलात्कार पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली होती. शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला होता. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये ती 90 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली होती. यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात ती आयुष्याच्या लढाईत अपयशी ठरली. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यापूर्वी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.AM News Developed by Kalavati Technologies