उन्नाव । पाचही आरोपींचे चेहरे समोर

उन्नाव बनली यूपीतील 'बलात्काराची राजधानी'

उन्नाव । उन्नावमध्ये यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान बलात्काराच्या 86 घटना नोंदविण्यात आल्या आहेत. आकडेवारी पाहिल्यास उन्नावला उत्तर प्रदेशातील 'बलात्काराची राजधानी' असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. उन्नावमध्ये सुमारे 31 लाख लोक राहतात. हा जिल्हा लखनऊपासून 63 किमी आणि कानपूरपासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर आहे. याबाबतच्या वृत्तानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर या काळात उन्नावमधील महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या 185 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे प्रेमाच्या आणाभाका घेत आरोपीने दोन वर्षांपर्यंत पीडितेचे शारीरिक शोषण केले. पीडितेने जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा तीन लाख रुपयांचे आमिष देऊन तिचा अडसर दूर करण्यासाठी दबाव आणला. पीडितेचे कुंटुब ऐकण्याच्या मनस्थित नाही, हे पाहून आरोपीने बिहारच्या पोलिसांमार्फत दबाव वाढवला. तरीही मागे न हटता पीडित मुलीने त्यांचा सामना केला. आरोपीला कारागृहात पाठवले. कारागृहातून सुटल्यानंतर आरोपीने पीडितेला जिवंत जाळले. या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींचे चेहरे समोर आले आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळणाऱ्यांचा चेहरा उजेडात

दरम्यान, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर ती 90 टक्के भाजली होती. काल मध्यरात्री तिचा दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रयांका गांधी यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेत तिचे सांत्वन केले. ''उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना या काळाशी लढण्यात हिंमत मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण तिला न्याय देऊ शकलो नाही हे आपल्या सर्वांचे अपयश आहे,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच तिला सुरक्षा का देण्यात आली नव्हती असा प्रश्नही त्यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies