नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला असून, या घटनेत नाईक यांच्या पत्नींसह ड्रायवरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण 6 जणांचा समावेश असून, या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या नाईक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात झाला. नाईक यांना गोव्याच्या रुग्णालयात हलवलं जात असून स्वतः पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. श्रीपाद नाईक यांच्याकडे केंद्रात आयुष मंत्रालयाचा पदभार आहे.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा भीषण अपघात, पत्नींसह पीएचा दुर्दैवी मृत्यू
केंद्रीय आयुष मंत्री यांना अपघात झाला असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे
