भारताकडे प्रत्यार्पण केले तर मी आत्महत्या करेल - नीरव मोदी

मंगळवारी सकाळी 9 वाजता तुरूंगातील अन्य कैदींकडून नीरव मोदीला मारहाण केल्याचे सांगण्यात आले.

नवी दिल्ली | पीएनबी बँकेला कोट्यावधी रुपयांचा चूना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. याच काळात नीरव मोदीनं न्यायालयाला पोकळ धमक्या देत असल्याची माहितीही मिळाली आहे. माझे भारताकडे प्रत्यार्पण केले तर मी आत्महत्या करेल अशी धमकी नीरव मोदीने दिली आहे. मला तुरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आली असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले आहे. यानंतरही न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली आहे. 

पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुमारे 2 अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणामध्ये नीरवला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे हजर करण्यात आले होते. त्याच्यावर भारतात प्रत्यार्पणाची टांगती तलवार डोक्यावर आहे. यापूर्वी नीरव मोदीकडून न्यायालयात 2 दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. तो आता दुप्पट करण्यात आला आहे. यासोबतच ज्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजरकैदेत ठेवले जाते, त्याचप्रमाणे स्वत: नजरकैदेत राहण्याचीही त्याची तयारी असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. दरम्यान, नीरव मोदीला एप्रिल महिन्यात तसंच गेल्या मंगळवारी तरूंगात मारहाण करण्यात आल्याचंही त्याच्या वकीलानं न्यायालसमोर सांगितले आहे.

मंगळवारी सकाळी 9 वाजता तुरूंगातील अन्य कैदींकडून नीरव मोदीला मारहाण केल्याचे सांगण्यात आले. यासोबतच त्याला लुटण्याचाही प्रयत्न करण्यात आला. केवळ नीरव मोदीला लक्ष्य केलं जात असल्याचे त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितल आहे. यासोबतच माध्यमांमध्ये यापुढेही त्याला कोट्यधीश हिरे व्यापारी असं म्हटलं गेलं तर यापुढेही त्याच्यावर हल्ले होतील. तसंच भारतात नि:पक्ष चौकशीही आपल्याला अपेक्षा नाही असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं आहे. दरम्यान न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी नीरव याच्या मानसिक स्थितीबाबत गोपनीय वैद्यकीय अहवालात नमूद केलेली महिती माध्यमांपर्यंत पोहचल्याबाबत नाराजी व्यक्त करून, यापुढे असे घडू नये अशी तंबी त्यांनी दिली.



AM News Developed by Kalavati Technologies