काश्मीरमधील चकमकीत कुख्यात दहशतवादी असिफ ठार

या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी असिफचा खात्मा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी असिफचा खात्मा करण्यात आला आहे.

नुकतीच सोपोरमध्ये एका फळ व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये हे कुटुंब जखमी झाले होते. यामधील एका लहान मुलीचा बळी गेला होता. तर सोपोरमध्ये एक प्रवासी श्रमिक शफी आलम यांच्यावर फायरिंग करण्यात आली होती. या सर्वांना कुख्यात दहशतवादी असिफ जबाबदार होता. आता त्याला भारतीय लष्कराने कंठस्नान घातले आहे.AM News Developed by Kalavati Technologies