प्रतिक्षा संपली..! 'सुपर फायटर राफेल' आज भारतात दाखल होणार

3 लढाऊ तर 2 प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार

नवी दिल्ली । सुपर फायटर राफेल विमानाची प्रतीक्षा अखेर संपली असून आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. राफेल विमानाची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. त्यामुळे अंबाला एअरबेसजवळील 3 कि.मी. पर्यंत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.3 लढाऊ तर 2 प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमधील झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमानं भारत-चीन सीमेवर तैनात करण्याबाबत चर्चा सुरू आहेत.

27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमान भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. सप्टेंबर 2016 रोजी फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. त्यामध्ये 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies