प्रतिक्षा संपली..! राफेलचे 'हॅप्पी लँडिग', राफेल भारतात दाखल..

फॉन्सहून आलेली 5 राफेल फायटर जेट अंबाला हवाईतळावर दाखल; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून दिली माहिती

नवी दिल्ली । शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या राफेल फायटर जेटचे अंबाला येथे आगमन झाले. राफेल अंबाला हवाईदलाच्या तळावर दाखल झाल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राफेल विमानांमुळे भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

भारतीय हवाईदलावर राफेल दाखल झाल्याचे व्हिडिओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला. याअगोदर आकाशात उंचीवर चालत असलेल्या 5 राफेल फायटर जेटचा व्हिडिओ सुद्धा संरक्षण मंत्र्याने ट्विट केले होते. भारताच्या अंबाला हवाईदलाच्या तळावर ही शक्तीशाली राफेल लढाऊ विमाने तैनात करण्यात येत आहेत. अंबाला हा भारतीय हवाई दलाचा अत्यंत मोक्याचा हवाई तळ असून या तळावरून शत्रूला चोख उत्तर देण्यासाठी हे तळ भारताला अत्यंत सोईचे असल्याचे मानले जाते. फ्रान्सकडून झेपावलेली राफेल ही घातक लढाऊ विमाने आज भारतीय भूमीवर उतरली आहेत.AM News Developed by Kalavati Technologies