दहशतवाद्यांनी दोन शाळा जाळल्या, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी तसेच शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्यासाठी दहशतवाद्यांनी आपल्या नापाक कारवाया सुरू केल्या असून आता कुलगाम जिल्ह्यातील दोन शाळा पेटवून देण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमागे नेमका कुणाचा हात आहे, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत असून हे दहशतवाद्यांचेच कृत्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies