विशाखापट्टणममध्ये जहाजाला लागली भीषण आग; 29 खलाशांच्या समुद्रात उड्या

विशाखापट्टणममध्ये जहाजाला लागली भीषण आग; 29 खलाशांच्या समुद्रात उड्या

विशाखापट्टणम । विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली. यामुळे जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या. या खलाशांपैकी एक जण बेपत्ता झाला आहे.  आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या समुद्रात आज, सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरवणाऱ्या जहाजाला आग लागली. यामुळे या जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी 28 जणांना कोस्ट गार्डने वाचवले असून यापैकी एक जण बेपत्ता झाला आहे. जहाजावरील आगीवरही नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.AM News Developed by Kalavati Technologies