निर्भयाच्या आरोपींना फाशीच, क्युरेटीव पिटीशन न्यायालयाने फेटाळली

न्यायमूर्ती एन.व्ही. रामना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे

नवी दिल्ली ।  निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांच्या क्युरेटिव याचिका याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहे. यामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येईल. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

न्यायमूर्ती एन.व्ही. रामना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. निकालादरम्यान न्यायाधीशांनी असे सांगितले की, गुणात्मक याचिकेत कोणताही आधार नसतो. न्यायमूर्ती एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आरएफ नरिमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

दोषींनी त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत. आता त्यांच्याकडे एकच घटनात्मक पर्याय आहे. दोषी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतात. राज्यघटनेच्या अनुच्छेद 722 नुसार राष्ट्रपतींना शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निर्भया घटनेतील चार दोषींना फाशी देण्याचे फाशीचे वॉरंट बजावले आहे.AM News Developed by Kalavati Technologies