योग्य मार्गदर्शनासाठी दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा - योगगुरू रामदेव बाबा

सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तिला देशाबद्दल जाणून घेण्याची गरज आहे.

इंदूर | अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या छपाक चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ती जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेली होती. यानंतर तिचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. आता यावर योगगुरू रामदेव बाबांनी भाष्य केले आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे. असा सल्ला त्यांनी दिला.

रामदेव बाबा म्हणाले की, दीपिका पादुकोणमध्ये अभिनय गुण आहेत ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तिला देशाबद्दल जाणून घेण्याची गरज आहे. तसेच तिला वाचनही करावे लागेल. हे समजून घेतल्यानंतरच तिने मोठे निर्णय घ्यावे असे रामदेव बाबा म्हणाले. तसेच, मला वाटते की अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी दीपिका पादुकोणने माझ्यासारखा एखादा सल्लागार ठेवायला हवा असा सल्लाही रामदेव बाबांनी दिला.AM News Developed by Kalavati Technologies