धक्कादायक! हैदराबादमध्ये एमआयएम कार्यकर्त्याची भर रस्त्यात दगडाने ठेचून हत्या

पैशाच्या वादातून मोहम्मद खलील यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

हैदराबाद । हैदराबादमध्ये भर रस्त्यात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद खलील असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. ते एमआयएम या पक्षाचे सदस्य होते. एका हॉटेल व्यावसायिकांनी खलील यांच्याकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं. हे पैसे परत मिळावा यासाठी खलील पाठपुरावा देखील करीत होते. आणि त्याचा राग आल्यामुळे तिघांजणांनी खलील यांना राजेंद्रनगर भागात बोलावलं होतं. त्यानंतर तीक्ष्ण हत्यारांना त्यांना भोसकलं. तसेच दगड्यांनी त्यांच्यावर सपासप वार केले. रस्त्यावरून अनेक गाड्या जात होत्या मात्र त्या आरोपींना रोखण्याचा कुणाचेही धाडस झाले नाही. खलील यांची भर रस्त्यात हत्या केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies