अयोध्या प्रकरण। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाचीही हार किंवा जीत नसेल - पंतप्रधान मोदी

निकालाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे.

नवी दिल्ली ।  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या प्रकरणावर उद्या निकाल येणार आहे. निकालाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. उत्तरप्रदेशातील शाळा, कॉलेज उद्यापासून तीन दिवस बंद असणार आहे. या सर्व पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट समोर आले आहे. अयोध्या प्रकरणावर आलेला निकाल कोणाचीही हार किंवा जीत नसेल असं मोदी यांनी ट्विटटरच्य़ा माध्यामातून म्हटलं आहे.

ऐतिहासिक अयोध्या खटल्यात उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे.  आज शनिवारी 10.30 वाजता अयोध्या प्रकरणी निकाल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जवळपास 500 वर्ष जुन्या अयोध्या प्रकरणात निकालाची वाट पाहत जवळपास दोन दशके गेली. प्रकरणात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. सर्व चढउतार असूनही अयोध्या प्रकरण अद्यापही संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तो सत्ता पक्ष असो वा विरोधी, सर्वांनी आपल्या पद्धतीने अयोध्या वाद उपस्थित केला. हे प्रकरण इतके गुंतागुंतीचे आहे की मध्यस्थी करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले, आता यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.AM News Developed by Kalavati Technologies