चीन-पाकची आता खैर नाही; सुपर फायटर राफेलची पहिली तुकडी काही तासांतच भारतीय सैन्याच्या ताफ्यात

राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सकडून भारताकडे झेपावली आहे

नवी दिल्ली | बहुचर्चित राफेल फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने भारतात येण्यासाठी फ्रान्समधून उड्डाण केले आहे. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या विमानाच्या पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी म्हणजेच 29 जुलै रोजी भारतात लँडिंग करणार आहेत. हरियाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ बनवण्यात आला आहे. 2016 साली भारताने फ्रान्स सोबत एक करार केला होता. 59 हजार कोटींचा या करारत 36 राफेल फायटर विमानांची खरेदी करण्यात आली होती.

राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी 'आयएएफ' चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली.

'आयएएफ' च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहेत. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीये.

भारत-चीन पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही विमान तिथे तैनात करण्याचा विचार सुरू आहे. या विमानाची हवेतून जमिनीवर 60 किमीपर्यंत अचून मारा करण्याची क्षमता आहे. वेगवान आणि अचून निशाणा साधणाऱ्या लढाऊ विमानमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमान असणार आहेत. त्यापैकी पहिली 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies