विरोधकांत फुट । कॉंग्रसने बोलावलेल्या बैठकीस आप, बसपा आणि तृणमूल अनुपस्थित

हुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांनी ट्विट केले की, आज कॉंग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत बसपा भाग घेणार नाही

नवी दिल्ली ।  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विरोधी पक्ष नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्ष एक असल्याचा संदेश विरोधक देणार होते. मात्र या बैठकीआधीच विरोधी पक्षांमधील फुट समोर आली आहे. तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि आम आदमी पार्टी या बैठकीत भाग घेणार नाही अशी माहिती आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपा सुप्रीमो मायावती आज विरोधी पक्षांच्या बैठकीत भाग घेणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीस उपस्थित न राहण्याचे आधीच सांगितले होते, तर मायावतींनी आज स्पष्ट केले की त्यांचा पक्ष या बैठकीला येणार नाही. बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांनी ट्विट केले की, आज कॉंग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत बसपा भाग घेणार नाही.

आम आदमी पार्टीने (आप) देखील विरोधी पक्षांच्या बैठकीस येण्यास नकार दिला आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी आज कॉंग्रेसने बोलविलेल्या विरोधी बैठकीला हजेरी लावली नसून ते म्हणाले की, अशा प्रकारच्या बैठकीबद्दल आम्हाला माहिती नाही. म्हणूनच, अशा कोणत्याही बैठकीला उपस्थित राहण्यात अर्थ नाही ज्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही.AM News Developed by Kalavati Technologies