प्लास्टिक फ्री भारताचे स्वप्न, मथुरामध्ये पंतप्रधान मोदींनी केली महामिशनची सुरुवात

पंतप्रधान मोदींनी येथे प्लास्टिक आणि कचरा वेगवेगळा करणाऱ्या मशीनचाही वापर केला.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळातच मथुरा येथील वेटरनरी विद्यापीठात पशु आरोग्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पशुंना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या टीकाकरण कार्यक्रमाचीही सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी देशभरातील 40 मोबाइल पशु चिकिस्ता वाहनांना हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदींनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचीही उपस्थिती होती.

गाय आणि इतर प्राणी हे रस्त्यांवर पडलेले प्लास्टिक खाऊन टाकात. ही अवस्था दूर व्हावी यासाठी मोदींनी हे अभियान सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींनी येथे प्लास्टिक आणि कचरा वेगवेगळा करणाऱ्या मशीनचाही वापर केला. तिथे उपस्थित लोकांशी बातचित केली. तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कामातही त्यांना मदत केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies