पश्चिम बंगालसाठी रवाना झाले पंतप्रधान मोदी, अन्फान वादळाचा घेणार आढावा

सर्व्हे करताना ममता बॅनर्जीही असणार सोबत

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळामुळे हाहाकार माजला आहे. येथे गेल्या 283 वर्षांमध्ये आलेले हे सर्वात भयानक वादळ आहे. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अम्फान प्रभावित परिसरांचा आढावा घेणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना बंगाल येथे येण्याचे आवाहन केले होते. यानंतर पंतप्रधान तिथे जात आहे. पंतप्रधान मोदी हे दिल्लीला रवाना झाले आहेत. बंगाल पोहोचल्यानंतर ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

सर्व्हे करताना ममता बॅनर्जीही असणार सोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अम्फान वादळाने प्रभावित पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करणार आहेत. अम्फानमुळे राज्याच्या दक्षिणी भागांमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी बंगालला जातील. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी कोलकातासोबतच उत्तर आणि दक्षिण 24 परगण्यातील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करतील.

कोरोना व्हायरस या संकटाच्या काळात पीएम मोदी हे तब्बल 83 दिवसानंतर प्रथमच दिल्लीच्या बाहेर जात आहेत. देशातील कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली.

त्यानंतर पीएम मोदी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र ते दिल्लीबाहेर गेले नाहीत. लॉकडाऊनच्या काही दिवस आधी पंतप्रधान मोदी दिल्लीबाहेर गेले नव्हते. अशा परिस्थितीत ते 83 दिवसांनंतर घराबाहेर पडत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies