हैद्राबाद पोलिस एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी पोलिसांच्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

नवी दिल्ली ।  हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींचे शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत. या पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी पोलिसांच्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१४ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन या कारवाईदरम्यान करण्यात आले नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या कारवाईत सहभागील पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता असून संबंधित पोलिसांवर करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies