निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंहने राष्ट्रपतींकडे केला दयेचा अर्ज

दया याचिका फेटाळल्यानंतर त्याला 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे

नवी दिल्ली ।  निर्भया घटनेचा दोषी मुकेश सिंह याने तिहार प्रशासनाला दया याचिका सादर केली आहे. ही याचिका तिहार प्रशासन राष्ट्रपतींकडे पाठवेल. जिथे राष्ट्रपती दया करायचा की नाही याचा विचार करेल. जर दया याचिका फेटाळली गेली तर त्याला फाशी देण्यात येईल.

तिहार प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्भयाच्या चार दोषींपैकी मुकेश याने मंगळवारी ही याचिका सादर केली. राष्ट्रपतींकडे दया याचिका हा त्यांचा शेवटचा पर्याय आहे ज्यामुळे त्याला जिवदान मिळू शकेल. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची क्युरेटीव याचिका (सुधारात्मक याचिका) मंगळवारी फेटाळून लावली. यानंतर, आता शेवटचा पर्याय म्हणजे राष्ट्रपतींकडे दयेची याचिका शिल्लक आहे, जी त्याने संध्याकाळ होताच प्रशासनाला पाठविली. दया याचिका फेटाळल्यानंतर त्याला 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे. या दोन्ही दोषींना (विनय कुमार शर्मा-मुकेश सिंग) फाशीवर स्थगिती मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक याचिका फेटाळून लावली होती.AM News Developed by Kalavati Technologies