Monsoon Session : आजपासुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

आजपासुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, या अधिवेशनाचे कामकाज 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाखांच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. अशातच आज (14 सप्टेंबर ) पासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदा हा अधिवेशनचे कामकाज 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदा पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र पार पडत आहे.

त्यामुळे खासदारांना नियमांचे पालन बंधनकारक असणार आहे. महत्त्वाच्या राजकीय पक्षांना मेन चेंबर आणि विजिटर्स गॅलरीमध्ये जागा नियुक्त करण्यात आल्या आहेत. अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या सीटचाही वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर खासदारांना 'अटेंडन्स रजिस्टर' अ‍ॅपद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे कहर कायम असतांना या अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला कोरोनाच्या मुद्दावरून घेरण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies