मोदींनी पक्ष्यांना दाणे खाऊ घातले अन् पक्षी बिचारे 'बर्ड फ्लू'च्या विळख्यात सापडले

देशात बर्ड फ्लूच्या नावावरून राजकरण करण्यात येत असून, समाजवादी पार्टीच्या नेत्याने बर्ड फ्लूवरून मोदींवर निशाणा साधला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट आले आहे. हरियाणा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. देशभारात कोरोनाने थैमान घातल्यानंतर, पुन्हा बर्ड फ्लूची भर पजडल्याने केंद्र आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

कोरोनाप्रमाणे बर्ड फ्लूवर सुद्धा देशात राजकारण होतांना पाहायला मिळत आहे. समाजावादी पार्टीचे नेते आय.पी. सिंह यांनी बर्ड फ्लू वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. सिंह यांनी मोराला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाणे खाऊ घालत असल्याचा फोटो शेअर केला आहे. व त्यात त्यांनी लिहले आहे की, ''या माणसाचं काय करावं', पक्षांना दाणे खाऊ घातले आणि पक्षीच बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले'' असे कॅप्शन सिंह यांनी लिहले आहे. दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला असून, परभणीतील मुरंबात 800 कोंबड्या दगावल्या आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies