मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख, तोपर्यंत मेगाभरती नाही

मराठा आरक्षणावर 1 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे, तोपर्यंत कोणतीही नोकरभरती घेऊ नका असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे

नवी दिल्ली | अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीला आता आणखी एक नवीन वळण मिळाले आहे. सुनावणी होईपर्यंत नोकरभरती करु नये, असं सांगत न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज दिला आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी तीन दिवसीय सुनावणीला सुरुवात झाली आहे.

मराठा आरक्षण प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का पाठवावे, यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपआपले म्हणणे द्यायचे आहे. जर घटनापीठाकडे प्रकरण गेले नाही तर 1 सप्टेंबरपासून सुनावणी होईल. तर राज्य सरकारकडून '15 सप्टेंबरपर्यंत कोणतीही भरती करणार नाही.' असं कोर्टात स्पष्ट करण्यात आले आहे.


आजच्या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उशीर झाला. त्यावर राज्य सरकारकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणे कठीण असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हे आदेश दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना या अडचणी येत असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies