मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला; 3 जवानांना वीरमरण तर 6 जण गंभीर जखमी

बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानील इंफाळच्या चंदेल जिल्ह्यात ही घटना घडली

मणिपूर । मणिपूरमध्ये लष्करावर दहशतवाद्यांनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 3 जवांना वीर मरण आले आहे. तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री 1.15 मिनीटाच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून 95 किलोमीटर अंतरावर चंदेल या जिल्ह्यात घडली आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला तो भाग पर्वतीय परिसर आहे. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने केलाचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हा दहशतवादी हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी आसाम रायफल जवानांवर गोळीबार सुरू केला होता. सदरील भाग हा पर्वतीय असल्याने या भागात भारतीय लष्कराकडून अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात 4 आसाम रायफल्सच्या 3 जवानांना वीरमरण आले. तर 6 जवान हे जखमी झाले आहे. जखमी जवानांना इंफाळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies