'बर्ड फ्लू'वर केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीत 'चिकन' विक्रीवर बंदी

देशात बर्ड फ्लूचे संकट ओढावल्याने दिल्लीत चिकन बंदी करण्यात आली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूनं आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्लीपोठापाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीवासियांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिल्लीबाहेरून येणाऱ्य़ा कोंबड्या आणि चिकनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली सरकार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून, नागरिकांनी घाबरू नये. कारण H5N1 या व्हायरसचा धोका मानवाला होत नसून, तो फक्त पक्षांना होत आहे. मागील आठवड्यात दिल्लीतून भोपाळल्या पाठवलेले सर्व आठ नमुन्यात बर्ड फ्लू आठळले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने चिकन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात 2006 साली सप्टेंबर- ऑक्टोंबर महिन्यात बर्ड फ्लू आला होता. त्यानंतर आता तब्बल 15 वर्षांनी बर्ड फ्लूने देशात आगमन केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies